पर्यावरण प्रकृती विभाग:
श्री गिरीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात महाराष्ट्रात, परराज्यात व परदेशात लाखो प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत असून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, दुर्ग संवर्धन, जल संवर्धन, दुर्मिळ वनौषधी संशोधन इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनातून नदी स्वच्छता, पाण्याची काटकसर, पुनर्भरण व पुनर्वापर उपक्रम, कचरा विनियोग व्यवस्थापन – टाकाऊ पासून टिकाऊ, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी फटाके व डी.जे.बंदी, फटाक्यांचा वापर न करता ई – दिवाळी हि Computer software, Mobile Application द्वारे साजरी केली जाते.
पर्यावरणातील विविध माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारातून बेरोजगारांना स्वयंरोजगार दिला जातो. उदा.मातीचे गणपती, आकाशकंदील, रक्षाबंधनासाठी राखी बनविणे इ . पशु, पक्षी व प्राणी यांची माहिती व संवर्धन, अन्न नासाडी टाळून अन्नदान मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावरण जनजागृती, गड – किल्ल्यांचे स्वच्छता – संवर्धन, पर्यावरण पूरक सेवा केंद्र कसे असावे यांसारख्या विविध उपक्रमातून जनजागृती व संदेश सर्वत्र पोहचविण्याचे कार्य या विभागातून होत आहे.
|
|
| एपीजे अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थ कृषी व पर्यावरण क्षेत्रातील कल्पक संशोधनास प्रोत्साहनपर मोफत स्टॉल कृषी महोत्सवामंध्ये देण्यात येतात. |
|
|
| कृषी महोत्सवामंध्ये पर्यावरण पुरक कृषी वास्तु डेमो साकारण्यात येतो. |
|
|
|
दिंडोरी येथे पर्यावरण पुरक जीवनशैली बाबतीत प्रात्यक्षिके उपलब्ध आहेत. |
|
|
|
दरवर्षी राज्यभर नदी जलसाठे स्वच्छता अभियान व जल पुजनाचा कार्याक्रम घेण्यात येतो. |
प्रतिवर्षी राज्यभर वृक्षलागवड:
श्री गिरीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्हयात पावसाळयात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संगोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
|
|
| वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत राज्यभरामंध्ये लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात येते |
|
|
|
वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत राज्यभरामंध्ये लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात येते. अशाच एका कार्यक्रमात आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे. |
|
|
|
वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत मोठया संख्येने व आनंदाने सहभागी सेवेकरी महीला,पुरुष व विदयार्थी. राज्यातील विविध जिल्हयात सदरील कार्यक्रमामंध्ये शेताच्या बाधावर, मोकळया जागेत, डोंगरावडील पडीत जागेत मोठया प्रमाणात वृक्ष लागवड संवर्धन करण्यात येते. |







