६ जानेवारी - सेवा-संकल्प दिन | मा. आबासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विचार, कृतज्ञता आणि प्रेरणादायी संकल्पांचा डिजिटल महोत्सव
” 6 जानेवारी हा मा. आबासाहेब मोरे यांचा वाढदिवस नेतृत्वाने, दूरदृष्टीने आणि अथक सेवाभावाने प्रेरणा देणारा एक उत्सव आहे “
या मंगल दिनी आपण आपल्या अंतःकरणातील आदर, कृतज्ञता, सद्भावना आणि प्रेरणा शब्दांच्या रूपाने अर्पण करू शकता, तसेच मा. आबासाहेब यांच्या विचारधारेशी निष्ठा राखत समाजहित, राष्ट्रहित आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर स्वतःला बांधून घेणारा सजग, जबाबदार आणि कृतीशील संकल्प येथे नोंदवू शकता.
या डिजिटल उपक्रमातून प्राप्त झालेल्या सर्व शुभेच्छा व संकल्प आदरणीय मा. आबासाहेब यांना सन्मानपूर्वक अर्पण करण्यात येतील, आणि पडताळणीनंतर अधिकृत संकेतस्थळावर गौरवाने प्रदर्शित केले जातील.
https://www.AabasahebMore.org
हे संकेतस्थळ तसेच सदरील “शुभेच्छा व संकल्प डिजिटल महोत्सव” मी श्री स्वामी समर्थ भक्त व आदरणीय मा. आबासाहेब मोरे यांचे अनुयायी सेवेकरी या नात्याने स्वेच्छेने, सेवा व समर्पण भावनेतून साकारले आहे.
या उपक्रमामागे केवळ आदर, कृतज्ञता आणि निष्ठेची भावपूर्ण सेवा–अर्पण आहे.
सेवा हीच साधना,
आणि समर्पण हेच समाधान.
श्री स्वामी समर्थ
