पर्यावरण प्रकृती विभाग:

श्री गिरीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात महाराष्ट्रात, परराज्यात व परदेशात लाखो प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत असून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, दुर्ग संवर्धन, जल संवर्धन, दुर्मिळ वनौषधी संशोधन इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनातून नदी स्वच्छता, पाण्याची काटकसर, पुनर्भरण व पुनर्वापर उपक्रम, कचरा विनियोग व्यवस्थापन – टाकाऊ पासून टिकाऊ, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी फटाके व डी.जे.बंदी, फटाक्यांचा वापर न करता ई – दिवाळी हि Computer software, Mobile Application द्वारे साजरी केली जाते.

पर्यावरणातील विविध माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारातून बेरोजगारांना स्वयंरोजगार दिला जातो. उदा.मातीचे गणपती, आकाशकंदील, रक्षाबंधनासाठी राखी बनविणे इ . पशु, पक्षी व प्राणी यांची माहिती व संवर्धन, अन्न नासाडी टाळून अन्नदान मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावरण जनजागृती, गड – किल्ल्यांचे स्वच्छता – संवर्धन, पर्यावरण पूरक सेवा केंद्र कसे असावे यांसारख्या विविध उपक्रमातून जनजागृती व संदेश सर्वत्र पोहचविण्याचे कार्य या विभागातून होत आहे.

 एपीजे अब्दुल कलाम स्मृती प्रित्यर्थ कृषी व पर्यावरण क्षेत्रातील कल्पक संशोधनास प्रोत्साहनपर मोफत स्टॉल कृषी महोत्सवामंध्ये देण्यात येतात.

 कृषी महोत्सवामंध्ये पर्यावरण पुरक कृषी वास्तु डेमो साकारण्यात येतो.

दिंडोरी येथे पर्यावरण पुरक जीवनशैली बाबतीत प्रात्यक्षिके उपलब्ध आहेत.

दरवर्षी राज्यभर नदी जलसाठे स्वच्छता अभियान व जल पुजनाचा कार्याक्रम घेण्यात येतो.

प्रतिवर्षी राज्यभर वृक्षलागवड:

श्री गिरीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्हयात पावसाळयात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संगोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

 वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत राज्यभरामंध्ये लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात येते

वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत राज्यभरामंध्ये लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्यात येते. अशाच एका कार्यक्रमात आदरणीय गुरुपुत्र आबासाहेब मोरे.

वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत मोठया संख्येने व आनंदाने सहभागी सेवेकरी महीला,पुरुष व विदयार्थी.

राज्यातील विविध जिल्हयात सदरील कार्यक्रमामंध्ये शेताच्या बाधावर, मोकळया जागेत, डोंगरावडील पडीत जागेत मोठया प्रमाणात वृक्ष लागवड संवर्धन करण्यात येते.