देश-विदेश जागतिक पातळीवर आध्यात्मिक, सामाजिक, आणि कृषीकार्याचा संक्षिप्तप्रवास व आढावा

  • आध्यात्मिक व मानवी समस्यावर मार्गदर्शन: १२८९+
  • शेतकरी गटांची स्थापना : १५००+
  • कृषी मेळावे: ५८०+
  • कृषी/ शेतकरी स्वावलंबी होण्यासाठीप्रशिक्षणे शिबिरे:९८०+
  • सर्व जाती-य धर्मीय वधू-वरांची स्थळे उपलब्ध :२००००+
  • स्वयंरोजगार प्रशिक्षणे व मार्गदर्शन: ७४०+
  • पर्यावरण प्रकृती व दुर्गसंवर्धन विभाग अंतर्गत जनजागृती(मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे): ८५०+
  • माहिती व तंत्रज्ञान सायबर सेक्युरिटी शिबिरांचे आयोजन: ४४०+
  • कृषी/पर्यावरण/पशु-गौवंश तज्ञांची सांगड व संपर्क:२५९+
  • पशु-गौवंश चर्चासत्र मार्गदर्शन:
  • जागतिककृषीमहोत्सव(दरवर्षी): २०१३पासूनसुरु
  • संपर्कात असलेले शेतकरी : २५०००+
  • दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत मदत : सुमारे५००+ कुटुंब

श्री आबासाहेब मोरे यांच्या तेजस्वी व्यक्तीमत्वाचा व कार्याचा देश, शेती, पर्यावरण व युवक यांच्यावर होणारा अतीशय प्रभावशाली शाश्वत परिणाम व सकारात्मक बदल-

श्री गिरीश (आबासाहेब) मोरे यांच्या समर्पण भावणेतुन व अखंड प्रयत्नातुन राज्यातील प्रत्येक क्षेत्रापर्यंत गावापर्यंत सातत्याने मार्गदर्शन व सेवा देणारे लाखोंच्या संख्येने अनुयाई सेवेकरी यांचे नेटवर्क महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात 7500+ सेवा केंद्रे, 8200+ कृषि समन्वयक व लाखोंच्या संख्येने सेवेकरींच्या माध्यमातुन अभारले आहे व त्याव्दारे अविरतपणे आध्यात्मिक, कृषि व ग्रामीण विकासासाठी अत्यावश्यक सर्व उपक्रम शेतकरी कुटुंबासाठी आयोजित केले जात आहेत ही सातत्याने होणारी फलप्राप्ती आहे.
यामंध्ये दिंडोरी येथे “आध्यात्मिक आणि विज्ञानाची” सांगड घालून तयार केलेले उत्कृष्ट 24 विविध प्रकारचे कृषी मॉडेल प्रात्यक्षिक उभारले आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने शेतकरी, युवक, महिला, बचतगट ई यांना प्रत्यक्ष अनुभवातुन व मार्गदर्शनातुन विविध कृषी मॉडेल स्वत: उभारण्यासाठी मोफत लाभ मिळत आहे.
सन 2013 पासुन दरवर्षी जागतिक कृषि मोहोत्सवाचे आयोजन करण्यात येते, त्या माध्यमातुन सुमारे 580 पेक्षाही अधिक कृषी मेळावे घेऊन सेंद्रीय शेती, पारंपारिक व अध्यात्मिक शेतीचे प्रात्यक्षिक, अधिुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणे ई बाबतीत मार्गदर्शन व प्रात्यक्षिके याचा थेट लाभ राज्यातील प्रत्येक जिल्हयातील शेतकरी बाधवांना सातत्याने होत आहे. सदरील महोत्सवामंध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी व बचत गटांच्या उत्पादनांची स्टॉलव्दारे थेट विक्रीव्दारे लाभ मिळत आहे.
राज्यातील व देशातील शेतकरी बियाणे, खते, औषधी ई. बाबतीत आत्मनिर्भर व्हावा व उत्पादन खर्च कमी होवुन देशातील जनतेला विषमुक्त अन्न मिळावे या हेतूने सेंद्रिय खते व औषधी निर्मिती, बियाणे उत्पादन, शेती उत्पाादनाचे मुल्यवर्धन, शेती मालाचे विपणन ई बाबतीत मोफत 980+ शेतकरी प्रशिक्षण राज्याच्या विविध जिल्हयामंध्ये आयोजित करण्यात आली आहेत. त्याचीच फलप्राप्ती म्हणुन आज मोठया संख्येने शेतकरी स्वावलंबी होणुन विषमुक्त उत्पादने करीत आहेत. पर्यावरण जागृती व संवर्धन करीता पर्यावरण प्रकृती व दुर्गसंवर्धन विभाग अंतर्गत 850 + मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे राज्यभर आयोजीत करण्यात आली आहेत.
श्री आबासाहेब मोरे यांनी 1500 + बचत गटांची निर्मीती करुन तसेच शेतकरी संघटन उभे करून दिंडोरी प्रणीत फार्मर शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना केली व सात्विक कृषीधन, कृषीमार्ट व कृषि योग हे ब्रँड विकसित करुन शेतकरी बाधवांना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. युवा शेतकरी करती 750+ स्वयंरोजगार मेळावे,प्रशिक्षणे व मार्गदर्शन उपक्रम घेतले आहेत व त्याव्दारे हजारो शेतकरी कुटुंबातील युवकांना रोजगार मिळाला आहे.
कृषीमध्ये माहिती व तंत्रज्ञान
(IT) व सायबर सेक्युरिटी चे 440 पेक्षा जास्त् शिबिरांचे आयोजन करण्यात आले. DindoriPranitSeva Marg व KrushiMahotsav या लाखोंच्या संख्येने सबस्क्रायबर असलेल्या युट्युब चॅनल व्दारे कृषी उपयोगी माहिती व तंत्रज्ञान संमंधी थेट प्रक्षेपण सातत्याने होत असते. मोबाईलचा शेतीविकासासाठी योग्य वापर होण्यासाठी SMS, WEBSITE, APP, SOFTWARE, SOCIAL MEDIA याव्दारे लाखो शेतकरी कुटुंबापर्यत महत्वाची माहीती व मार्गदर्शन योग्य वेळी पोहंचवले जाते. तसेच राज्यभरातुन 25000+ शेतकरी थेट संपर्कात असुन ते ज्ञानदानाचे सेवा कार्य करतात.
देशी गायींच्या विविध प्रजातींचे जतन व संवर्धन
देशी पशु-गौवंश, संगोपन आणि संवर्धन तसेच यास पूरक जोडव्यवसायातुन आर्थीक लाभ मिळावा करीता 259+ तज्ञांची सांगड घालुन मार्गदशन शिबीने आयोजीत करण्यात आली आहेत. श्री आबासाहेब यांच्या संकल्पनेतुन गायींसाठी “मुक्त संचार गोठा" हि संकल्पना मोलाची ठरली व मोठया संख्येने शेतकरी प्रेरीत होवुन गोवंश वाढण्यास व पूरक जोडव्यवसायातुन आर्थीक लाभ होण्यास यश आले.
शाकंबरी आरोग्यवाटिका व सिड बँक
शाकंबरी आरोग्यवाटिका व सिड बँक ही दुर्मीळ, औषधी व आरोग्यदायी वनस्पती तसेच पारंपरिक गावराण भाजीपाला बियाण्यांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी उभारलेली एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या अंतर्गत रोपवाटिकेत विविध उपयुक्त, दुर्मीळ व औषधी वनस्पतींच्या रोपांचे उत्पादन करून त्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, मार्गदर्शन व वाटप करण्यात येते, ज्यामुळे नागरिकांना आरोग्यपूरक वनस्पतींचा प्रत्यक्ष लाभ घेता येतो. तसेच शाकंबरी सिड बँक उपक्रमाअंतर्गत पारंपरिक व महत्त्वाच्या गावराण भाजीपाला बियाण्यांचे संकलण, जतन व नियोजित वाटप करून स्थानिक बियाण्यांचे संवर्धन केले जाते. या माध्यमातून शेतकऱ्यांचे बियाण्यावरील परावलंबित्व कमी होऊन जैवविविधता, अन्नसुरक्षा व शाश्वत शेतीस बळकटी मिळते.
“दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त" कुटुबातील 20,000+ विवाहस्थळे उपलब्ध करुन विनामूल्य विवाह सोहळ्यांचे आयोजन, 500 + कुटुबांना पंचसुत्री कार्याक्रमाचा लाभ, हजारो शेतकरी कुटुंबांना शेतीची औजारे, त्यांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप, योग्य मार्गदर्शनातून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या बाबींचा समावेश आहे.
श्री गिरीश (आबासाहेब) मोरे यांच्या संकल्पानेतुन, समर्पन भावणेतुन व निस्वार्थ अविरत कष्टातुन लाखोंच्या संख्येने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहभागी अनुसायी सेवेकरी यांना सातत्याने प्रेरीत ठेवुन राज्यात व देशात महत्वाची अभुतपुर्व पुण्यदाई अशी कार्यसेवा पार पडत आहे. आध्यात्म, पर्यावरण, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान अशी विलक्षण सांगड घालुन विविध माध्यमातुन अविरतपणे सेवा कार्य सुरु आहे यामंध्ये विषमुक्त कमी खर्चाची सेद्रींय शेती, प्रक्रीया उदयोग, शेतकरी संघटन, विविध शेतीमालाचे ब्रॅडींग व विक्री व्यवस्थापन, स्वयंरोजगार, कृषि माहिती तंत्रज्ञानाचा वापर, गोवंशाचे संवर्धन सोबत पुरक व्यवसाय व दुष्काळग्रस्त -आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार पंचसुत्री कार्यक्रम. श्री गिरीश (आबासाहेब) मोरे यांचे हे अतुलनीय सेवा कार्य राज्यास व देशास विकासाकडे नेतांना चिरंतर सुख, समृदधी, आरोग्य देणारे आहे.