शेतकरी कुंटुबासाठी विवाह संस्कार विभाग:

श्री गिरीश (आबासाहेब) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  या विभागात  सुयोग्य वैवाहिक जोडीदार मिळवून सुखी व समाधानी जीवनासाठी विवाह संस्कार विभागाद्वारे विविध इच्छुकांना अध्यात्मिक सेवा व मार्गदर्शन केले जाते. सर्व जाती-धर्मियांसाठी मोफत नाव नोंदणी करून विवाहानुरूप अपेक्षित स्थळांची माहिती देण्यात येते. विवाहापूर्वी व विवाहतर मार्गदर्शन करून, कुलधर्म व कुलाचार विषयक मार्गदर्शन केले जाते. गर्भवती माता भगिनींना प्रसूतिपूर्व प्रसुतीपश्चात उपयुक्त संस्काराची मार्गदर्शन करण्यात येते.आदिवासी समाजासाठी विशिष्ट विवाह मंडळ. हुंडा मानपान अनिष्ट रूढी यांचे निर्मूलन इत्यादीद्वारे जनजागृती करण्यात येते. वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी हा विभाग कार्यशील आहे.